त्रिपुरी पौर्णिमा (टिपर) उत्सव

दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी त्रिपुरी उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ग्रामस्थांकडून आलेल्या शिध्याचा महाप्रसाद बनवला जातो. देवीपुढे “बारापाच स्थळांच्या नावे वाडी” दाखविली जाते. प्रथम ब्राम्हणांनी प्रसाद ग्रहण केल्यावर मंदिराच्या सभागृहात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.
रात्रौ देवीसमोर परंपरेप्रमाणे पणत्या पेटवून दीपोत्सव व गा-हाणे झाल्यावर वर्सलदार मानकरी हस्ते कोहळ्याची विधिवत पूजा केली गेली. कोहळे दीपमाळेवर ठेवले गेले. दोन्ही दीपमाळा वर१ नंबर वकलातील कांबळी (कांबळीवाडी), २नंबर वकलातील कांबळी(मधलीवाडी) ग्रामस्थांनी दिव्याची रोषणाई करून ह्या दीपोत्सवा ला शोभा आणली होती. त्यानंतर वारेसूत्रासह पालखी (भक्त मंडळी ग्रामस्थ देवी चा ‘उदो उदो’ चा घोष करीत बालगोपाळ मंडळी सह) जैन ब्राह्मण मंदिर स्थळाकडे गेली. तेथील जैन ब्राह्मण देवाला गा-हाणे करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा सर्व मंडळी श्री भद्रकाली मंदिराला प्रदक्षिणा करण्यासाठी आली. एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ह्या एका दिवसाच्या त्रिपुरी पौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात येते

Info

  • Category: कार्यक्रम
  • Address: भद्रकाली मंदिर रेवंडी , मालवण
  • Start: November 12, 2019
  • End: November 12, 2019