सवन

दिनांक 25 जुलै 2018 रोजी बारापाचातील एक स्थळ श्री क्षेत्रपाल देवस्थानात साजरा करण्यात आलेला महत्त्वपूर्ण पारंपारिक धार्मिक कार्यक्रम होय. सर्जेकोट येथील रामकृष्ण रमाकांत जोशी कुटुंबीय आणि खराडे कुटुंबीय व सर्जेकोट मिरया बांदा येथील त्यांचे सर्व मच्छीमार बांधव मिळून हा कार्यक्रम करतात. एकूण तीन स्थानी हा विधी होतो. दि. सकाळी श्री क्षेत्रपाल देवस्थानची विधिवत पूजाअर्चा, गा-हाणी, ब्राम्हण भोजन व इतरांना महाप्रसाद असा हा कार्यक्रम दरवर्षी भद्रकाली मंदिरातील तीनही वर सरदार मानकरी, पुजारी व काठी कर यांच्या सन्माननीय उपस्थित साजरा केला गेला.

भोजन झाल्यावर मानकरी, पुजारी, काठी कर व जोशी कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी सागर कड्यावर असलेल्या बारापाचातील पिराच्या स्थानी लोबान अर्पण करण्यासाठी गेले. पीरस्थानाला गा-हाणे करून त्या देवतेचे आशीर्वाद घेऊन मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे सागर किनारी आली. तेथे सागर देवतेचेही आपल्या मत्स्यव्यवसायाला साहाय्य व्हावे, सुरक्षित सागर प्रवास व्हावा, सागर देवतेचे आशीर्वाद मिळावे अशा तऱ्हेचे गार्‍हाणे करून हा लोबान विधी संपन्न झाला. त्यानंतर समुद्रात जाळे (शेंडी पागून) टाकून मत्स्य व्यवसायाची प्रतीकात्मक सुरुवात करण्यात आली.

Info

  • Category: कार्यक्रम
  • Address: भद्रकाली मंदिर रेवंडी , मालवण
  • Start: July 25, 2018