पालेडाळप (भोवाळणी)

नूतन वर सरदार मानकऱ्यांच्या वर्षभरातील देवस्थान रहाटी चा हा पहिला पारंपारिक धार्मिक कार्यक्रम दिनांक 15 जुलै 2018 रोजी पार पडला दुपारी तीन वाजता देवीसमोर गा-हाणे झाल्यावर देवी समोरच्या चौकात ग्रामस्थांनी आणलेल्या नारळा पैकी बेचाळीस नारळ फोडून त्यांचे पाणी वरच्या सभामंडपातून पायर्‍यांवरून खालच्या मोठ्या सभामंडपात जाऊ देण्यात आले हा कार्यक्रम म्हणजे श्री फळातील पवित्र शुद्ध पाण्याने मंदिराचे श्रद्धेने केलेले शुद्धीकरण होय! त्यानंतर नारळ खोबऱ्याचा सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. देवीच्या बारा पाच आतील एक स्थळ महारस्थळ (काठी करांचे स्थान) येथे सर्व मानकरी व ग्रामस्थ मंडळी गेल्यावर तेथे काठी करा वरील वारी सूत्र वाढविण्यात आले. त्या देवतेचा आशीर्वाद आणि आदेश मिळाल्यानंतर पुढील कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गाराने केले गेले. पाले जळगावातील कार्यक्रमांतर्गत पुढील भाग म्हणजे संध्याकाळी सहानंतर रेवंडी च्या उत्तर सीमेवरील काशी कल्याण मंदिरानजीक बारापाचाला  गाराने आणि नारळाच्या रसाबरोबर हात प्रसाद म्हणून वाटला गेला हा एक पारंपरिक प्रथा जपणारा असा कार्यक्रम झाल्यावर सूर्यास्तानंतर आपल्या रेवंडी गावच्या उत्तर सीमेपासून दक्षिणपूर्व असलेल्या सर्जेकोट मिर्याबंदा येथील चतुर सीमा संरक्षित करण्याचा आणि गावातील इडापिडा वाईट दृष्ट शक्तीरूपी दादरे सीमेपलीकडे सोडण्याचा कार्यक्रम पार पाडला गेला.

Info

  • Category: कार्यक्रम
  • Address: भद्रकाली मंदिर रेवंडी , मालवण
  • Start: July 15, 2018