नवरात्रोत्सव आणि दसरा (विजयादशमी)

नवरात्रात रोज संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत देवीला सालंकृत सजविले जाते. पहिल्या रात्री वारे सूत्रे उभी करून त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेतले जातात. 10 ऑक्टोबर 2018 ते 17 ऑक्टोबर 2018 ह्या म्हणजे घटस्थापने दिवशी सकाळी मानकरी हसते घट पूजन करून घटस्थापना केली गेली. त्यानंतर पहिल्या म्हणजेच 10 ऑक्टोबर 2018 रात्रीपासून दिनांक 17 ऑक्टोबर 2018 पर्यंतच्या प्रत्येक रात्री गोंधळी कथा व भजनांचा कार्यक्रम पार पडला. सांगली (जयसिंगपूर) येथील प्रतिवर्षी येणारे श्री बाळकृष्ण भिसे कुटुंबीय यांच्याकडून देवीसमोर गोंधळी कथा सांगून संबळाच्या तालावर देवीचा जागर केला गेला. रात्री ८.३० ते ९.४५ हा कार्यक्रम झाल्यावर रात्री दहा वाजता प्रत्येक रात्री दोन/ तीन याप्रमाणे रात्री एक वाजेपर्यंत तर भजनांचा कार्यक्रम पार पडला. पंचक्रोशीतील भजन मंडळे नाम मात्र मानधनावर ही देवीची सेवा मोठा श्रद्धेने करतात. भजना बरोबरच शेवटच्या रात्री सर्जेकोट मिर्याबंदा येथील ग्रामस्थांचा पारंपारिक ‘लळीताचा’कार्यक्रम सदर केला गेला.

नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम शिस्तबद्धपणे व नियोजित वेळी पार पडण्यास वर सरदार मानकरी मंडळींना गावातील तरुण कार्यकर्त्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने सहाय्य केले. शेवटी विजयादशमीला (दसरा) सीमोल्लंघन करण्यासाठी देवीची लावा जम्या सहित पालखी, वारेसुत्रासह जैन ब्राह्मण स्थळाला भेट देऊन आपट्याची पाने (सोने) लुटण्यासाठी नियोजित स्थळी आली. तेथे आपट्याचे विधीवत पूजन व पालखी वारे सुत्रा सह प्रदक्षिणा झाल्यावर सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. नंतर पुन्हा पालखी व वारे सुत्रा सह सर्व मंडळी मंदिरात आल्यावर ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. ग्रामस्थ महिला, माहेरवाशिणी तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने श्रीदेवी भद्रकाली च्या मंदिरात होणाऱ्या विजयादशमीच्या कार्यक्रमास उपस्थित राहतात. दरवर्षी भाविकांची संख्या वाढतच आहे.ओट्या भरणे, गा-हाणी व देवी दर्शन ह्या सर्व कार्यक्रमांच्या वेळी तरुण कार्यकर्ते दरवर्षी खूपच मेहनत घेतात. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच! तीही एक त्यांची देवीची सेवाच असते. भक्तिभावाने केलेली! दुपारी दोन ते संध्याकाळी जवळजवळ सहा वाजेपर्यंत मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलेला असतो.या सर्व कार्यक्रमात रेवंडी तील महिलांचा सहभागही महत्त्वाचा असतो.

नवरात्र उत्सवामध्ये वर सरदार मानकर यांनी पुर्वापार प्रथेप्रमाणे नऊ दिवसांमध्ये गाऱ्हाणे व देवीच्या ओट्या भरणे बंद ठेवल्या व प्रथेप्रमाणे दसऱ्या दिवशी ज्यावेळी पालखी मंदिरात येते त्यावेळी मानकर यांच्या ओट्या पहिल्या भरल्यानंतर सर्व भाविकांच्या ओट्या भरल्या जातात.

Info

  • Category: कार्यक्रम
  • Address: भद्रकाली मंदिर रेवंडी , मालवण
  • Start: October 10, 2018
  • End: October 17, 2018