नवी पूजन

दिनांक 14 सप्टेंबर  2018 रोजी नवान्न पूजनाचा कार्यक्रम पार पडला. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी होणारा (उंदीरबी ) हा कार्यक्रम म्हणजे तीनही मानकरी आणि वर सरदार पुजारी वाजंत्री सह मंदिरा नजीकच्या पाटणी भाताची विधिवत पूजा करून ते भात कापून आणून त्या भाताच्या ओंब्यांची मानकर यांच्या हस्ते मंदिराजवळील तुळशीवृंदावनासमोर पूजा केली गेली. पूजेनंतर भाताच्या ओंब्या, आंब्याची पाने यांच्या साह्याने तोरणे तयार करून मंदिरात बांधली गेली. या दिवसानंतर कापणी सुरू करून उत्पादित झालेल्या भाताचा तांदूळ करून वापरावयास हरकत नसावी. हा संदेश शेतकरी वर्गाला दिला जातो. जाणू हा देवीचा आशीर्वाद आणि कौलच असतो.

Info

  • Category: कार्यक्रम
  • Address: भद्रकाली मंदिर रेवंडी , मालवण