श्री देवी भद्रकालीचा वार्षिक जत्रोत्सव २०१९

श्री देवी भद्रकालीचा वार्षिक जत्रोत्सव दि १५/११/२०१९ रोजी संपन्न होणार आहे. सकाळी ७.३० वा. पासुन ते सायंकाळी ७.०० पर्यंत ओटि भरण्याचा कार्यक्रम चालु राहिल.
रात्रौ ८.०० वा. पोथी वाचन होईल व तद् नंतर अवसारी तत्वे उभी केली जातील व पालखी प्रदक्षीणा सोहळ्याला सुरवात होईल. ५ प्रदक्षीणा पुर्ण करुन पालखी पुन्हा मंदिरात आल्यावर पुन्हा ओटि भरण्याच्या कार्यक्रमाला सुरवात होईल.
पालखी सोहळ्यानंतर दशावतारी नाट्यप्रयोगाला सुरवात होईल. पहाटे हा कार्यक्रम संपन्न झाल्यावर पुन्हा अवसारी तत्वे उभी केली जातील. गाडगे फोडुन पालखी गंगास्न्हानासाठी बाहेर पडेल व पालखी पुन्हा मंदीरात आल्यावर कार्यक्रमाची सांगता होईल…..
अधिक माहितीसाठी संपर्क
०२३६५२५२६०१

 

Info

  • Category: कार्यक्रम
  • Address: भद्रकाली मंदिर रेवंडी , मालवण
  • Start: November 15, 2019
  • End: November 15, 2019