|| श्री देवी भद्रकाली रेवंडीचा इतिहास ||
रेवंडीची देवी भद्रकाली हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवस्थानच्या जुन्या जाणत्या व अनुभवी मानकर्यां कडून काही माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार मंदिराची स्थापना सुमारे ४०० वर्षांपूर्वी झाली असावी, असे सांगण्यात येते. येथील रेवंडीच्या कांबळी घराण्यातील मूळ वंशज हे काशीहून आले. ते प्रथम कांदळगावच्या सीमेवरून सध्या असलेल्या कांबळीवाडी येथे वास्तव्यास आले. रेवंडी गावची मध्यवर्ती जागा निवडून तेथे श्री शंकर व पार्वती या उभयता देवतांची काळ्या पाषाणाची लिंग स्वरूपात स्थापना केली. हे अर्धनारीनटेश्वराचे एकरूप स्वरूप आहे. तसेच भद्र म्हणजे शिवशंकर व काली म्हणजेच पार्वतीमाता असल्यामुळे ही देवता ‘भद्रकाली’ या नावाने प्रसिद्ध झाली.
या पवित्र स्थानात देवीच्या आगमनासंबंधी असे सांगितले जाते की, एकदा देवी पार्वती माता भगवान शंकरावर रुष्ठ होऊन या निर्जन व निसर्गरम्य अशा मनोहर ठिकाणी येऊन राहिली. तिची समजूत काढण्यासाठी भगवान शंकर अनेक देवता व आपल्या गणांसह येथे अवतरले. माता पार्वती संतुष्ट झाल्यावर उभयतांनी आमच्या येथे कायम वास राहील व आमच्या भक्तांचे सदैव रक्षण करू, असे वरदान दिले.
अधिक वाचा >>>